
क्वालालंपूर – मलेशिया येथे बोट उलटून ६६ जण बेपत्ता झाले आहेत. घटनास्थळी बचाव पथक दाखल झाले असून, ते बोटीतील प्रवाशांचा शोध घेत असून त्यातील आता पर्यंत ३१ प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, ६० पेक्षा अधिक प्रवासी बेपत्ता आहेत.
मलेशिया; बोट उलटून ६६ जणांना जल समाधीची शक्यता?
या बोटीत इंडोनेशियातील ९७ प्रवासी होते. यात महिला आणि लहान मुंलाचा देखील समावेश आहे. मलक्का खाडीमध्ये मध्यरात्री बोट उलटली. या बोटीमधून अवैधरीत्या प्रवासी जात होते. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याने ही बोट उलटल्याचे समजते.
बोट उलटलेल्या ठिकाणी एक बचाव नौका दाखल झाली आहे. अनेकांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बोट नागरिकांच्या वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेली नव्हती. या बोटीमधून नागरिक प्रवास करत होते. मात्र, बुडालेल्या नागरिकांना वाचविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
