मुख्यमंत्रिपद वाटून घेणार सेना-भाजप

sena-bjp
मुंबई – शिवसेना व भाजपच्या वतीने राज्यात महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पहिली अडीच वर्ष शिवसेनेला व पुढची अडीच वर्ष भाजपाला मुख्यमंत्रिपद देण्याविषयी दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते.

भाजपने लोकसभा निवडणूकीत मिळालेल्या अभुतपूर्व यशानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीकडे लक्ष्य केंद्रित केले आहे. एकहाती मिळालेल्या सत्तेनंतर आत्मविश्वास वाढलेल्या भाजपने राज्यात जास्तीत जास्त जागा लढविण्याची तयारी केली आहे. राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँगेसकडून सत्ता हिसकावून घेण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यात सत्ता आल्यास मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याविषयी भाजपने तयारी दर्शविली आहे.

Leave a Comment