प्रीती झिंटा- नेस वाडीया वादाचा फटका खेळाडूंना, चौकशी होणार

dess-wadia
मुंबई – अभिनेत्री प्रीती झिंटा व नेस वाडिया प्रकरण आता चांगलेच चिघळले असून किंग्ज इलेव्हन पंजाब संघातील काही खेळाडूंची चौकशी पोलीस करणार आहेत . ३0 मे रोजी वानखेडे स्टेडियमवरील गरवारे पॅव्हेलियनची तिकिटे प्रीतीने कोणाकोणाला दिली होती, याचीही चौकशी केली जाणार असून हा प्रकार ज्यांनी पाहिला त्यांनाही चौकशीसाठी पाचारण केले जाणार आहे.

ज्या-ज्या वेळी या संघाचा सामना वानखेडे स्टेडियमवर असे, त्या-त्या वेळी या दोघांमध्ये वाद होत असे. काही वेळेला हा वाद गरवारे पॅव्हेलियनच्या अतिथी बॉक्समधून मैदानापर्यंत जात असे. या वादातील संभाषण अनेकदा खेळाडूंनी ऐकले असल्यामुळे या खेळाडूंनाही चौकशीसाठी बोलावले जाणार असल्याचे सूत्राने सांगितले. प्रीती शनिवारपर्यंत अमेरिकेतून मुंबईला परतणार असून त्यानंतरच या प्रकरणाच्या तपासाला वेग येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.त्यात किंग्ज इलेव्हन पंजाब संघातील खरेदी केलेल्या खेळाडूंना त्यांची रक्कम प्रीतीच्या बँक खात्यातून अदा करण्यात आल्याची माहिती सूत्राने दिली.त्यामुळे वाडिया यांचा वाटा किती हा मुद्दाही भागीदारीच्या दृष्टीने महत्वाचा ठरला आहे.

Leave a Comment