चव्हाणांचा होणार पायउतार? शिंदे नवे मुख्यमंत्री!

prithviraj-chavan
मुंबई – काँग्रेसने वाढती नाराजी लक्षात घेऊन मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचारी सुरु केल्या आहेत. त्याचबरोबर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची मुख्यमंत्री पदी वर्णी लागू शकते असे ही संकेत दिल्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना पायउतार होवे लागण्याची शक्यता आहे.

राज्याचा मुख्यमंत्री पुन्हा एकदा बदलाच्या हालचालींना दिल्लीत वेग आला आहे. विद्यमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या जागी नव्या नावाची घोषणा येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे.

माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर आहे. त्याशिवाय महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचीही नावे स्पर्धेत आहेत.

मुख्यमंत्री चव्हाण यांच्या विरोधात काँग्रेस पक्षांतर्गत नाराजी प्रचंड वाढली असल्यामुळे, पुन्हा एकदा मुख्यमंत्री बदलाच्या मागणीला वेग आला आहे.आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असतानाच, काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री बदलाचे वारे वाहू लागले आहेत.

Leave a Comment