लिलाव होणार ;कांद्याची दरवाढ टळली

onion
नाशिक – नाशिक येथे उद्यापासून काद्यांचा लिलाव सुरू होणार आहे. १० जुलैपर्यंत योग्य तोडगा काढण्यात येणार असल्याच्या अटीवर कांद्याचा लिलाव सुरू होणार असल्याचे समजते .परिणामी कांदा दरवाढीचे संकट टळले आहे.

कांदा प्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांनी समन्वय बैठक घेऊन हा तात्पुरता तोडगा काढला आहे. नाशिकच्या जिल्हा बँक सभागृहात ही बैठक झाली , या बैठकीला लोकप्रतिनिधी, माथाडी कामगार आणि व्यापारी यांसह जिल्हा उपनिबंधकही उपस्थित होते.तसेच शेतकऱ्यांचे प्रतिनिधीही यावेळी उपस्थित होते. यावेळी व्यापारी आपल्या मागणीवर ठाम होते. लेव्ही ४४ टक्क्यांवरून ३४ टक्के करण्यात यावी ही व्यापाऱ्यांची प्रमुख मागणी असताना मात्र माथाडी कामगारांचा लेव्ही कमी करण्यास नकार होता. यावेळी पणन संचालक आखाडे यांनी तोडगा काढला आहे. यामुळे उद्यापासून कांदा लिलाव सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे .

Leave a Comment