आता पोलिस भरती प्रक्रिया होणार हिवाळ्यात

r-r-patil
मुंबई – चार उमेदवारांचा मृत्यू झाल्याने आता गृहखातेही खडबडून जागे झाले आहे. भर उन्हात भरतीप्रक्रिया राबविताना शारीरिक क्षमतेच्या तपासणीसाठी पाच किलोमीटर अंतर उमेदवारांना धावायला लावल्याने चार जणांचा मृत्यू झाल्याने पोलिस विभागावर सर्व स्तरातून टीका होत आहे, आणि मुंबई उच्च न्यायालयानेही खडसावले आहे, या पार्श्वभूमीवर पोलिस भरती हिवाळ्यात घेण्यात येईल असे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी जाहीर केले आहे.

मुंबई व नवी मुंबईतील पोलीस भरतीदरम्यान गेल्या आठवड्यात शारीरिक क्षमतेची चाचणी देताना चार उमेदवारांचा मृत्यू झाला. भरतीच्या ठिकाणी असलेला मूलभूत सुविधांचा अभाव, स्पर्धांसाठी चुकीच्या जागांची निवड आणि परीक्षेच्या चुकीच्या वेळांमुळे या तरुणांना जीव गमवावा लागला त्यामुळे राज्य सरकार व पोलिसांच्या या बेफिकिरीविरोधात प्रचंड नाराजी असून या प्रकाराची गंभीर दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली होती.त्यानुसार गृहमंत्री पाटील यांनी या पुढे हिवाळ्यात पोलिस भरती प्रक्रिया होणार असल्याचे म्हणाले आहेत.

Leave a Comment