माजी आमदाराचा राष्ट्रवादीला ‘रामराम ‘

manda
नवी मुंबई – राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चव्हाट्यावर येत आहे, मंत्री गणेश नाईक यांच्याविरुद्ध तक्रार करीत माजी आमदार मंदा म्हात्रे यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

मंदा म्हात्रे यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात आपला राजीनामा दिला आहे. पालकमंत्री गणेश नाईक यांच्या मनमानीमुळे आपण राजीनामा देत असल्याचेही म्हात्रे यांनी राजीनामा देतांना म्हटले आहे.मंदा म्हात्रे यांनी राजीनामा देतांना केलेल्या या आरोपांमुळे राष्ट्रवादीची अंतर्गत धुसफुस चव्हाट्यावर आली आहे. म्हात्रे यांच्या म्हणण्यानुसार त्यांना अनेक त्रास देण्यात येत असून आपल्यावर अन्याय होत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment