राफेल नदाल फ्रेंच ओपनचा बादशहा

nadal123

पॅरिस- फ्रेंच ओपन टेनीस स्पर्धेत नवव्या वेळेस विजेतेपद पटाकावित राफेल नदालने ज्योकोविचचा पराभव करीत विजेतेपद पटाकाविले आहे. फ्रेंच ओपनच्या लाल मातीवर पुन्हा एकदा दमदार कामगिरी करताना नदालने ज्योकोविचचा पराभव केला.

रविवारी झालेल्याया मॅचकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आतापर्यंतचा या दोघांमधील हा तब्बल ४२ वा सामना आहे. आतापर्यंतच्यार या सामन्याात राफा २२-१९ असा थोडासाचा आघाडीवर. त्यामुळे यंदा या ट्रॉफीवर आपलं नाव कोण कोरणार याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता होती. इतिहास कोण निर्माण करणार राफा का नोव्हाक? अर्थात विजयाबरोबर नंबर वनचा किताबही पणाला लागला होता.

अतिशय उष्ण वातावरणात सुरु झालेल्या या सामन्यात ज्योकोविचने धडाक्यात सुरुवात करत पहिल्या सेटपासूनच वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. बॅकहँड आणि ग्राऊंड कव्हरेजमुळे पाहता पाहता हा सेट नोव्हाकने ६-३असा खिशात टाकला. काही तरी वेगळं घडणार असं वाटत असतानाच राफाने दुसऱ्या सेटमध्ये आपला खेळ उंचावला. पण नोव्हाकही त्याला जशास तसे उत्तर देत होता राफाने हा सेट ७-५असा जिंकत मॅच बरोबरीत आणली.तिसऱ्या सेटमध्ये मात्र राफाने आपल्या ताकदवान फोरहँडचा ताबडतोड वापर करत नोव्हाकला निष्रभ केले. डबल ब्रेक मिळवत राफाने हा सेट ६-२असा जिंकला.

वातावरणातील तणाव आणि वाढती उष्णता यामुळे ज्योकोविच नदालच्या फिटनेस आणि चपळतेची बरोबरी करु शकतो का अशी शंका टेनिसप्रेमींच्या मनात यायला लागली. पण थकेल तो नोव्हाक कसला. त्याने आपला प्रतिकार सुरुच ठेवला. पण राफानेही खेळाची लय आणि रिदम कायम ठेवत. नोव्हाकला खेळवत ठेवलं. अखेर तब्बल तीन तास ३० मिनिटांनंतर ज्योकोविचच्या डबल फॉल्टमुळे राफाला फ्रेंच ओपनचे विजेतपद मिळविता आले.

Leave a Comment