पंकजा यांना मंत्रिपद देण्याची मागणी

pankaja
मुंबई : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर त्यांची ज्येष्ठ कन्या आमदार पंकजा मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्यात यावे; अशी मागणी घेऊन महायुतीच्या नेत्यांचे एक शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहे; अशी माहिती महायुतीचे आणि मराठा समाजाचे नेते विनायक मेटे यांनी दिली. महायुतीच्या या शिष्टमंडळात भाजप नेते देवेंद्र फडणवीस, शिवसेना कार्ध्यक्ष उद्धव ठाकरे, विनायक मेटे, महादेव जानकर तसेच राजू शेट्टी हे नेते असणार आहेत.

गोपीनाथ मुंडे यांच्या ज्येष्ठ कन्या पंकजा मुंडे-पालवे या परळीच्या आमदार आहेत. पित्याच्या निधनानंतर त्यांनी कुटुंबीयांना आधार देण्याबरोबरच कार्यकर्त्यांनाही सावरले. मुंडे यांच्या अंत्यदर्शनावेळी गोंधळ झालेल्या गोंधळानंतर प्रसंगावधान राखून पंकजा यांनी कार्यकर्त्यांना धीर देत शांततेचे आवाहन केले आणि आपली जबाबदारी योग्य रीतेने पार पाडली; असे मेटे यांनी सांगितले.पंकजा यांचा राजकारणात सक्रिय सहभाग आहे. यामुळे मुंडे यांच्या निधनानंतर कार्यकर्त्यांसह आता महायुतीच्या नेत्यांनीही पंकजा यांच्याकडे नेतृत्व सोपवावे अशी मागणी केली आहे.

Leave a Comment