मी केंद्रातच खुश ,महाराष्ट्रातील निवडणुका सामूहिकरित्या लढवू – पवार

sharad-pawar
मुंबई – विरोधी बाकांवर बसणेही कधी-कधी चांगले असते ,असा उल्लेख करीत लोकसभा निवडणुकीतील पराभवाने नाउमेद न होता, आत्मविश्वासाने लोकांचा विश्वास जिंका असा सल्ला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना दिला. मात्र मी केंद्रात खूश आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणुका सामूहिकरित्या लढवू, असे स्पष्ट करीत पवारांनी आपण राष्ट्रवादीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार नसल्याचेही जाहीर करून विषयाला पूर्णविराम दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 15 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.यावेळी शरद पवारांनी पुन्हा एकदा कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्ता आणि नेत्यांमध्ये अंतर वाढत चालल्याचे सांगतानाच त्यांनी नवे कार्यकर्ते जोडण्याचा सल्ला पक्ष पदाधिकाऱ्यांना दिला.ज्यावेळी मी सत्तेत नसतो तेव्हा अधिक आनंदी असतो. कार्यकर्ते,लोकांना वेळ देता येत असल्याने , पक्ष मजबूत करण्याची संधी मिळते. पराभवातून नाउमेद न होता, लोकांमध्ये मिसळा आणि पुन्हा एकदा त्यांचा विश्वास जिंका. लोकसभेचा निकाल म्हणजे महाराष्ट्रातील विधानसभेचा निकाल नाही.हेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

Leave a Comment