आता महाराष्ट्राच्या राजकारणात रस नाही – नितीन गडकरी

gadkari_8
नागपूर – भाजपचे दिवंगत नेते आणि केंद्रीय कृषी मंत्री गोपीनाथ मुंडे यांची महाराष्ट्रावर पकड होती;मात्र आता ते हयात नसल्याने तूर्त तरी सामुहिक नेतृत्वावर भर देण्याचा कार्यक्रम भाजपने आखला असला तरी जे नेते आहेत,त्यांनीही एकट्याने धुरा उचलण्यास नकार दर्शविला आहे. खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही आता महाराष्ट्रात रस नसल्याचे म्हटले आहे.

येत्या ऑक्टोबरमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपचे नेतृत्व करायला आवडेल का या प्रश्नावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात परत येण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट केले आहे , त्यांनी म्हटले आहे कि , प्रारंभी मला केंद्रीय राजकारणात अजिबात रस नव्हता. मात्र आता दिल्ली सोडून राज्याच्या राजकारणात परत येण्याची माझी इच्छा नाही असे नमूद केले आहे. तीन जून रोजी दिल्ली येथील अपघातात केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले. त्यानंतर मुंडे यांच्याजवळ असलेल्या चार खात्यांचा तात्पुरता कार्यभार गडकरींकडे सोपवण्यात आला आहे.त्यामुळे गडकरी यांनी महाराष्ट्राची धुरा नको अशी प्रतिक्रया दिली आहे.

Leave a Comment