राष्ट्रवादीचा वर्धापनदिन;पवारांचा कोणता ‘गजर’ !

pawar
मुंबई – नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीचा दारूण पराभव झाल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा १५वा वर्धापन दिन सोहळा माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे धोरण काय असेल याचे संकेत या मेळाव्यातून दिले जाण्याची शक्यता असून पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे कोणती भूमिका मांडतात, आणि पक्षात ‘भाकरी’ फिरवतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ‘झाडाझडती’ घेतली होती आणि विधानसभेसाठी कामाला लागण्याचे आदेश देतांना लोकांपुढे साधेपणाने सामोरे जा असा सल्लाही दिला होता या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वर्धापनदिन सोहळ्यात कोणते चिंतन होते हा मुद्दा महत्वाचा ठरणार आहे.
मेळाव्याला राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे प्रमुख २० पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले असून, विधानसभा निवडणूक हा प्रमुख अजेंडा राहील असा अंदाज आहे .

या मेळाव्यास राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे प्रमुख मार्गदर्शन करतील. शिवाय राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष भास्करराव जाधव, सर्व कॅबिनेट व राज्यमंत्री​ आणि विविध आघाड्यांचे प्रमुख हजर राहतील असे पक्षातर्फे सांगण्यात आले आहे .लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या लाटेने राजकीय उलथा-पालथ झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत , त्याला राष्ट्रवादीही अपवाद नाही. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची ‘झाडाझडती’ या आधीच घेतली होती.आणि आता नव्या चेहऱ्यांना संधी देवून ‘भाकरी’ फिरविण्याचे संकेत दिले होते .

राष्ट्रवादीच्या चिंतन बैठकीत पवार यांनी पुन्हा लोकांपर्यंत पोहचा ,जिल्ह्या- जिल्ह्यात कार्यकर्त्यांचे मेळावे घ्या ,अशा सूचना करताना मात्र पक्षात भपकेबाजपणा वाढत असल्याकडेही लक्ष वेधले होते . ,भपकेबाजपणा सोडा आणि साधेपणाने थेट जनतेमध्ये मिसळा. लोकसभेत जे घडले ,ते विधानसभा निवडणुकीत घडेल असे काही नाही, आपल्याला तशी काळजी नाही पण आपण जनतेत पोहचलो पाहिजे. आता स्वतः १४-१५ तास पक्षासाठी वेळ देणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले होते शिवाय ,आता पुरे झाले आहे, येत्या विधानसभेला नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. अशा शब्दातही त्यांनी पदाधिकार्यांना खडसावले होते . त्यामुळे वर्धापनदिनाचे निमित्त साधून पवार काय बोलतात याकडे राजकीय लक्ष लागले आहेत.

Leave a Comment