मुंडेंची भाजपमध्ये उपेक्षाच – फुंडकर

fundkar
मुंबई – भाजपमध्ये दिवंगत नेते आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांची घुसमट होत होती, त्यांच्यावर अपमानित होण्याचेही क्षणही नेहमीच आले,त्यामुळेच भाजप सोडण्यासाठी मुंडे यांना कॉंग्रेसने केंद्रात दोन तर राज्यात दोन-दोन मंत्रीपदे देण्याची ऑफर दिली होती;पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट मुंडेनी घेतली,त्यांना भगवा टिळा लावून भगवा सोडून जायचे नाही अशी शपथ शिवसेनाप्रमुखांनी घातली. त्यामुळे द्विधा मनस्थितीत असलेल्या मुंडेनी माझ्याशी निर्णयाबाबत विचारणा केल्याचा गौप्यस्फोट पांडुरंग फुंडकर यांनी केला आहे,शिवाय त्यांच्या अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही साश्रू नयनांनी केली.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबाबतच्या कृतज्ञता प्रस्तावावर फुंडकर बोलत होते. फुंडकर म्हणाले की, मुंडे यांच्याशी आपला गेल्या ४० वर्षांची घट्ट मैत्री होती. भाजप बहुजनांचा पक्ष करण्यासाठी त्यांनी कष्ट घेतले. त्यांनी पक्षात अनेकांना मोठे केले. मात्र पक्षात उपेक्षा झाल्याने जेव्हा त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा विचार केला तेव्हा काँग्रेसने त्यांना केंद्रात दोन मंत्रीपदे व महाराष्ट्रात दोन मंत्रीपदे देऊ केली होती.
मुंडे यांनी काँग्रेसमध्ये न जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर ज्यावेळी पक्षात ते अस्वस्थ होतं तेव्हा तुम्ही मला काँग्रेसमध्ये जाऊ दिले नाही. हेच दिवस पाहण्यासाठी तुम्ही मला थांबवले का, असे मुंडे आपल्याला ऐकवत होते. अशी कबुलीही फुंडकर यांनी दिली. केंद्रीय मंत्रिमंडळात आपला समावेश होईल किंवा नाही याबाबतही मुंडे अखेरपर्यंत साशंक होते,याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Leave a Comment