नदाल-मरे समोरा-समोर

nadal

पॅरिस- फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत आगामी काळात अटातटीच्या लढती पाहवयास मिळणार आहेत. आता ‘लाल मातीचा बादशहा’ असलेल्या राफेल नदाल यांची लढत चिवट खेळासाठी प्रसिद्ध अँडी मरे सोबत होणार आहे.या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.या सामन्यात विजयी होणा-यास फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्‍ये जाता येणार आहे.

या स्पर्धेतील उपांत्यापूर्व लढतीत राफेल नदालने त्याफचा जिवलग मित्र डेव्हिड फेररवर याचा सरळ सेट मध्ये पराभव केला. नदालने या सामन्यात फेररचा ४-६, ६-४, ६-०, ६-१ असा सरळ सेट मध्येे पराभव केला. तर दुसरीकडे अँडी मरेने फ्रान्सच्या गेइल मॉनफिल्सवर ६-४, ६-१, ४-६, १-६, ६-० असा संघर्षपूर्ण विजय मिळवत उपांत्य फेरीत स्थान पटकावले. डेव्हिड फेररने पहिल्या सेटमध्ये फोरहँडच्या ताकदवान फटक्यांच्या जोरावर सरशी साधली. सावध सुरुवात करणाऱ्या नदालला स्थिरावण्यासाठी वेळ लागला आणि याचा पुरेपूर फायदा उठवत फेररने तुफानी आक्रमण केले. नदालला नमवत फेरर इतिहास घडवणार असे चित्र होते, मात्र पहिला सेट गमावलेल्या नदालने त्वेषाने खेळ करत फेररला कडवी टक्कर दिली.

तीन वर्षांपूर्वी याच स्पर्धेत उपांत्य फेरीतच मरेला नदालविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. क्ले कोर्टवर मरेला नदालवर एकही विजय मिळवता आलेला नाही. मात्र गेल्या महिन्यात रोम मास्टर्स स्पर्धेत नदालविरुद्ध खेळताना त्याने एक सेटजिंकला होता. मात्र इतिहास बाजूला ठेवून नवा पराक्रम घडवण्याची संधी मरेला आहे. दुसरीकडे फ्रेंच खुल्या स्पर्धेकतला नदालचा दबदबा वाढतच चालला आहे. फेररवर विजयासह नदालने फ्रेंच खुल्या स्पर्धेत ६४ लढतीत विजय मिळवला आहे. आणि केवळ एका लढतीत त्याला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यातमुळे आता कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment