दगडफेक … पंकजा मुंडे -पालवेंकडून खेद;पण चौकशीची मागणी

munde
परळी – भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी झालेल्या दगडफेकीबद्दल मुंडे यांच्या कन्या आणि परळीच्या आमदार पंकजा मुंडे-पालवे यांनी खेद व्यक्त केला आहे ;पण चौकशी करण्याची मागणीही केली आहे.
गोपीनाथ मुंडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराच्या वेळी लाखो लोक महाराष्ट्रातून आले होते. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी लोक जमा झाले होते. यावेळी जमाव हिंसक बनला ,मंत्र्यांच्या गाड्याही अडविण्यात आल्या त्यात जमावातून दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली. त्यात दोन पोलीस अधिकाऱ्यांसह १२ पोलीस जखमी झाले . बीडच्या जिल्हा पोलीस अधिकक्षकांना दगड लागल्याचे वृत्त आहे. या घटनेबद्दल पंकजा मुंडे पालवे यांनी खेद व्यक्त केला असून या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली आहे. या दगडफेकप्रकरणी पोलिसांनी दहा जणांना अटक केली आहे.

Leave a Comment