सत्यपालसिंग यांच्या फ्लॅटमध्ये देहव्यापार

satyapal_0
मुंबई- मुंबईचे माजी पोलिस कमिशनर आणि आता भाजपचे खासदार सत्यपालसिंग यांच्या अंधेरी येथील फ्लॅटवर छापा टाकून पोलिसांनी देहव्यापारात गुंतलेल्या दोन मुली आणि अन्य तीन जणांना अटक केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या सोसायटीत अनेक पोलिस अधिकार्‍यांचे फ्लॅट असून सत्यपाल यांच्या फ्लॅटमध्ये देहव्यापार सुरू असल्याची तक्रार आल्यानंतर शनिवारी रात्री येथे छापा टाकला गेल्याचे समजते. या फ्लॅटमधून सत्यपालसिंग यांच्या नावाचे वीजबिलही मिळाले आहे. याच सोसायटीतील अन्य एका फ्लॅटमधून पोलिसांनी कांही महिन्यापूंर्वी टाकलेल्या छाप्यात २ लाख अश्लील सीडी जप्त करण्यात आल्या होत्या.

हा फ्लॅट इंडिया बुल्स कंपनीला भाडेतत्त्वावर देण्यात आला आहे. फ्लॅटमध्ये सापडलेल्या व पोलिसांनी अटक केलेल्या मुली कंपनी मालकाच्या सांगण्यावरून तेथे आल्या होत्या असे समजते. सत्यपाल सिंग यांनी हा फ्लॅट वरील कंपनीला तीन वर्षाच्या भाडेकरारावर दिला आहे. त्यामुळे घडलेल्या घटनेची जबाबदारी त्यांच्यावर नाही असे त्यांचे म्हणणे आहे. पोलिस अधिकार्‍यांच्या घरातच देहव्यापार चालत असल्याची ही पहिलीच घटना आहे.

सत्यपालसिंग यांनी पोलिस विभागाचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश केला असून प्रथमच त्यांनी भाजपच्या तिकीटावर बागपत येथून निवडणूक लढवून ती जिंकली आहे.

Leave a Comment