वनडे मालिकेत श्रीलंका-इंग्लंडची बरोबरी

shrilanka

लंडन : श्रीलंका-इंग्लंड विरूध्दच्या पाच वनडे मालिकेत चौथा सामना जिंकत मालिकेत दोन-दोन बरोबरी साधली आहे. या सामन्याात श्रीलंकेने कुमार संगकाराच्या शतकाच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना ९ बाद ३०० धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडला ८ बाद २९३ धावाच करता आल्या. पाचवी व निर्णायक वन-डे मंगळवारी एजबॅस्टनला खेळली जाईल.

लक्ष्याचा पाठलाग करताना १११ धावांतच इंग्लंडचा निम्मा संघ गारद झाला होता. या परिस्थितीत बटलरने ४ षटकार, ११ चौकारांनिशी ७४ चेंडूंत १२१ धावा केल्या. त्याने रवी बोपाराच्या साथीने सहाव्या विकेटसाठी १३३ धावांची भागीदारी रचली. यामुळे इंग्लंडच्या विजयाच्या आशा कायम होत्या.

अनुभवी लसिथ मलिंगाने अफलातून गोलंदाजी करत तीन मोहरे टिपले आणि सामना फिरविला. त्यानेच शतकवीर बटलरला धावचीत केले. बटलरने ६१ चेंडूंत शतक पूर्ण केले. इंग्लंडतर्फे तो सर्वांत वेगवान शतक ठोकणारा फलंदाज ठरला. तरी पण इंगलंडला ३०० धावांचा टप्पा्या गाटता न आल्याने सात धावांनी विजय मिळविला.

Leave a Comment