कोलकत्ताच आयपीएल चॅम्पियन

ipl123

बेंगलोर- बंगळुरमध्ये चिन्नास्वामी स्टेडियमवरील आयपीएलच्या फायनलमधील रोमहर्षक लढतीत कोलकाता नाईट रायडर्सने पंजाबवर मात करत चॅम्पियन होण्याचा मान पटकावला आहे. पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहचलेल्या पंजाबला मात्र चॅम्पियनपदाने हुलकावणी दिली आहे. मनीष पांडेच्या दमादार फलंदाजीच्या जोरावार कोलकत्तकयाला विजय मिळविता आला.

फायनलच्याह या लढतीत प्रथम फलंदाजी करताना पंजाबने प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात केली पण ओपनिंगला आलेला विरेंद्र सेहवाग सात धावांवर बाद झाला. त्यानंतर वोहराने टीमची बाजू सांभाळत अर्धशतक पूर्ण केले तर ग्लैन मॅक्सवेलच्या खराब फार्म लक्षात घेता कप्तान जॉर्ज बेले तिसर्याण क्रमाकांवर उतरला पण ३० धावाकडून पव्हेलियनमध्ये परतला. पंजाब इलेव्हन्सने निर्धारीत २० ओव्हरमध्ये १९९ धावांचे आव्हानन उभे केले होते.

२०० धावांचे टार्गेट घेवून मैदानात उतरलेल्या कोलकाता संघाच्या मनीष पांडेने सर्वाधिक ९४ रन्स करुन टीमच्या विजयाच्या पायाभरणी केली. मनीषने ५० चेंडूत सात चौकार आणि सहा षटकार लावून विजयाचा भार हलका केला. ऑरेंज कॅपचा दावेदार रॉबिन उथप्पा या मॅचमध्ये पाच रन्सवर आऊट झाला. कप्तान गौतम गंभीरने २३ रन्स करुन आऊट झाला तर युसूफ पठाणने ३६ रन्सची खेळी पेश केली. कोलकाताने अखेरच्या ओव्हरपर्यंत झुंज देत दुसर्यां दा चॅम्पियन होण्याचा मान पटकावला.

Leave a Comment