नदाल, शारापोवाची आगेकूच सुरुच

tennis

पॅरिस – फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत जगातील नंबर वन असलेल्या राफेल नदाल आणि नंबर वन असलेली महिला खेळाडू मारिया शारापोवाने या स्पधर्धेतील विजयी घौडदौड सुरुच ठेवली आहे. नदाल व शारापावा हिने विजय मिळविताना दमदार कामगिरीच्याी जोरावर विजय मिळवीत तिसर्याश फेरीत धडक मारली.

या स्पफर्धेतील पुरुष एकेरीच्या दुस-या फेरीत राफेल नदालने ऑस्ट्रियाच्या डोमिनिक थिईमाचा पराभव केला. नदालने डोमिनिकचा सरळ सेटमध्ये पराभव कराताना ६-२, ६-२, ६-३ अशा फरकाने सरळसेटमध्येज सामना जिंकला. यासाठी त्याला डोमिनिकने तीन सेटपर्यंत झुंजवले. तर दुसरीकडे महिला गटात मारिया शारापोवाने बुल्गारियाच्या स्वेताना पिरोनकोवाला सरळ दोन सेटमध्ये धूळ चारली. तिने ७-५, ६-२ ने विजय मिळवला.

या स्पयर्धेत रदांवास्काने चेक गणराज्यच्या कॅरोलिनाचा ६-३, ६-४ ने पराभव केला. दुसरीकडे पाचव्या मानांकित डेव्हिड फेररने पुरुष एकेरीची तिसरी फेरी गाठली. त्याने दुसर्याम फेरीत इटलीच्या सिमोन बोलल्लीचा पराभव केला. या स्पोर्धेत फेररने ६-२, ६-३, ६-२ अशा फरकाने सामना जिंकला. मात्र, यासाठी त्याला इटलीच्या खेळाडूने तब्बल एक तास ४८ मिनिटे झुंजवले.

भारताची स्टार खेळाडू सानिया मिर्झाने गुरुवारी झिम्बाब्वेच्या कारा ब्लॅकसोबत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसर्या् फेरीत धडक मारली. या पाचव्या मानांकित जोडीने महिला दुहेरीच्या सलामी सामन्यात अवघ्या ७० मिनिटांत शानदार विजय मिळवला. सानिया-काराने दुहेरीच्या लढतीत स्लोव्हाकियाची डॅनियल हंतुचोवा आणि सारा पीरचा ६-३, ६-३ अशा फरकाने पराभव केला.

Leave a Comment