आता मुंबईपेक्षा पुणे मोठे !

pune
पुणे – पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत शहरालगतच्या 34 गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिका ही राज्यातील सर्वात मोठी महापालिका ठरणार आहे. राज्य सरकारने आजच याबाबतचा अध्यादेश जारी केला आहे.क्षेत्रफळाच्या दृष्टीने मुंबईपेक्षा पुणे मोठे ठरले आहे.

३४ गावांच्या समावेशामुळे महापालिकेचे क्षेत्र दुपटीने वाढणार आहे.सद्यस्थितीत पुण्याचे क्षेत्रफळ 243 चौरस किलोमीटर आहे; पण आता 34 गावांच्या समावेशामुळे पुण्याचे क्षेत्रफळ सर्वसाधारण ५६० चौरस किलोमीटर होणार आहे. मुंबई महापालिकेचे क्षेत्रफळ सुमारे 450 चौरस किलोमीटर आहे.

शहराच्या हद्दीलगत असणाऱ्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरु आहेत , त्यावर नियंत्रण राखणे शक्य व्हावे , तसेच गावांचा सुनियोजित विकास व्हावा, यासाठी ही गावे पालिकेत समाविष्ट केली जावीत, अशी मागणी केली जात होती. त्यानंतर सरकारने याबाबतचा अध्यादेश काढून 34 गावांचा पुणे महानगरपालिकेत समावेश केला आहे.