आयपीएलचा फायनल सामना बंगळुरूलाच

ipl4

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून आयपीएलच्या फायनलवरून वाद सुरु होता. त्यामुळे १ जून रोजी खेळला जाणारा अंतिम सामना कुठे होणार यावरून वाद सुरू होता. या वादावर आता पडदा पडला असून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० स्पर्धेचा फायनल ठरल्याजप्रमाणे बंगळुरूलाच होत आहे. असा निर्णय आयपीएल प्रशासकीय समितीने घेतला आहे.त्यामुळे मुंबईकरांची घोर निराशा झाली आहे.

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० स्पध्रेचा अंतिम सामना मिळवण्यासाठी १४ अटींची पूर्तता करा, या मुंबई क्रिकेट असोसिएशनला (एमसीए) दिलेल्या वचनाला आयपीएल प्रशासकीय समिती जागली नाही. एमसीएच्या यजमानपदाच्या मागणीला केराची टोपली दाखवत आधी जाहीर केल्याप्रमाणे आयपीएलचा अंतिम सामना १ जूनला बंगळुरूलाच होणार आहे.

आयपीएल प्रशासकीय समितीच्या शनिवारी रात्री झालेल्या चर्चेत या विषयावर विचारविमर्श करण्यात आला.याचप्रमाणे अंतिम सामना बंगळुरूला खेळवण्याच्या आधीच्या निर्णयावरच कायम राहण्याबाबत या बैठकीत एकमत झाले,’ अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव संजय पटेल यांनी बडोद्याहून दिली. शरद पवार यांनी या आठवडय़ात ही परवानगी मिळेल, असे आश्वासन दिले होते. परंतु अंतिम सामना बंगळुरूलाच ठेवणार असल्याच्या आयपीएल प्रशासकीय समितीच्या निर्णयाविषयी मी अनभिज्ञ असल्याअचे त्यांनी स्प्ष्ट केले आहे.

Leave a Comment