अबकी बार…ची पाकलाही धास्ती;मोदींना आमंत्रण

sharif_4
नवी दिल्ली – भारताच्या विरोधात कायम राहून सीमेवर ‘घुसखोरी’ करणाऱ्या पाकिस्तानने ‘अब की बार ,मोदी सरकार’ची धास्ती घेतली आहे. सत्तेवर भाजप सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाल्याने पाकच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करून त्यांना पाकिस्तानच्या भेटीचे आमंत्रणही दिले आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनीही भारतीय जनता पक्षाच्या ऐतिहासिक विजयाबद्दल नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींना पाकिस्तान भेटीचे निमंत्रणही दिले आहे. नवाझ शरीफ यांनी नरेंद्र मोदी यांना फोन करुन लोकसभा निवडणुकीतील भरघोस यशाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आणि पाकिस्तान दौऱ्यावर बोलावले आहे. मोदींचे सरकार सत्तेवर येणार आहे, त्यात त्यांची कणखर भूमिका असल्याने झटपट निर्णय आणि कृती होणार हे साहजिकच आहे त्यात मागील सत्तेत भाजपच्या नेत्यांची भूमिका पाहता ,यंदा काय ? यावरच विचारमंथन पाककडून सुरु असेल,असे मत आंतरराष्ट्रीय अभ्यासकांचे आहे.

Leave a Comment