अमूलचा वाराणसीत प्रकल्प

amul
वाराणसी- अच्छे दिन आनेवाले है अशी आशा दाखवून वाराणसीतून निवडणूक लढविणार्‍या नरेंद्र मोदी यांनी वाराणसीला खरोखरच चांगले दिवस दाखविण्याचे ठरविले आहे. कारण मोदींच्या पाठोपाठच द टेस्ट ऑफ इंडिया अशी जाहिरात करणार्‍या जगप्रसिद्ध मिल्क ब्रँड अमूलने वाराणसीत २०० कोटी रूपये किमतीचा डेअरी प्रोसेसिंग प्रकल्प उभारणीचे काम सुरू केले आहे. या प्रकल्पात दररोज ५ लाख लिटर दुधावर प्रक्रिया करून त्याचे अन्य दुग्धजन्य पदार्थ बनविले जाणार आहेत.

गुजराथमधील बनास डेअरी कडे अमूल दूध व दुग्धजन्य पदार्थ निर्मिती आणि विक्रीचे काम आहे. ही आशियातील सर्वात मोठी डेअरी आहे. डेअरीचे अध्यक्ष पार्थो भटोल या संदर्भात माहिती देताना म्हणाले की, वाराणसीच्या विमानतळाजवळच आम्ही औद्योगिक क्षेत्रात भूखंड खरेदी केला आहे. उत्तर प्रदेश औद्योगिक विकास महामंडळाशी त्यासंदर्भातला कायदेशीर करार करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात दुध उत्पादन प्रचंड प्रमाणात होते मात्र संघटीत क्षेत्रात केवळ १ लाख लिटर दुधाचाच वापर केला जातो. दुध संकलन, प्रोसेसिंग आणि विक्र्री याचा लाभ शेतकर्‍यांपर्यंत पोहोचत नाही. अमूल शेतकर्‍यांपर्यंत हा लाभ पोहोचवणार आहे.

अमूल लखनौ आणि कानपूर येथेही लवकरच ५ -५ लाख लिटर क्षमतेचे प्रोसेसिंग प्रकल्प उभारणार असल्याचेही भटोल यांनी सांगितले.

Leave a Comment