शरद पवारांना दिलासा ;’घराण्याची परंपरा’अबाधित

sule
पुणे – देशात कॉंग्रेसचा सुपडा साफ झालेला असतानाच महाराष्ट्रातही कॉंग्रेस -राष्ट्रवादी आघाडीचा सफाया झाला आहे. महायुतीने वर्चस्व मिळविले आहे. मात्र या धामधुमीत घराण्याची ‘परंपरा’ अबाधित ठेवण्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना यश मिळाले तर आहे पण कन्येच्या विजयाने दिलासाही मिळाला आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मतदारांना साकडे घालताना सुप्रिया सुळे या वडील व्यासपीठावर असताना रडल्या होत्या त्यामुळे त्या धोक्यात अशी चर्चा होती मात्र त्या ७० हजारांच्या मतांनी निवडून आल्याने पवार घराण्याने सुटकेचा निश्वास सोडला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या करतात. शिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विधानसभा मतदारसंघ याच मतदारसंघात येतो. २००९ साली झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेत या मतदारसंघात पुणे शहरालगतचा भाग समाविष्ट झाला. परिणामी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मताधिक्यात थोडा फरक पडला आहे. या मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघापैकी बारामती (राष्ट्रवादी), दौंड (अपक्ष), इंदापूर (कॉंग्रेस), पुरंदर (शिवसेना) भोर (कॉंग्रेस) आणि खडकवासला (भाजप) असे पक्षीय बलाबल आहे. ‘आप’कडून निवृत्त पोलीस अधिकारी सुरेश खोपडे बारामतीतून निवडणूक रिंगणात शिवाय महायुतीने महादेव जानकर यांच्यासारखा मजबूत उमेदवार समोर असताना पवारांना त्याचीच चिंता होती शिवाय पुरंदरमधून जगताप घराणे आणि आमदार विजय शिवतरे यांची राष्ट्रवादीला धास्ती होती. पुण्यात विश्वजित कदम यांना मदत हवी असेल तर बारामतीत आम्हाला मदत करा ,अशी तडजोड राष्ट्रवादीने कदमांचे व्याही जगताप यांच्याशी केली होती. अखेर ती सफल ठरली.

Leave a Comment