मोदींना उद्धव यांच्या लंडनहून शुभेच्छा

thakeray
मुंबई – विविध वाहिन्यांवर एक्झिट पोलचे निकाल पाहिल्यानंतर भारतात सत्तापरिवर्तन होणार हे निश्चित मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानपदाचे दावेदार भाजपचे नरेंद्र मोदी यांना लंडन येथून शुभेच्छा दिल्या आहेत. एक्झिट पोलच्या निकालांमुळे भाजप युतीत उत्साह भरला असून युतीत सहभागी असलेल्या स्वाभीमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम पक्ष, आरपीआय यांच्या नेत्यांनीही मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्रात महायुतीला किमान ३३ जागा मिळण्याची खात्री वाटत असून हा आनंद साजरा करण्यासाठी भाजपचे अतुल शहा यांनी २० हजार लाडूंची ऑर्डर दिली आहे. मुंबईच पाच मोक्याच्या ठिकाणी मोठे स्क्रीन लावून निवडणूक निकाल पाहण्याची व्यवस्था केली जात आहे. विजयी मिरवणुकांसाठी गुलाल, ढोल ताशे, फटाके, रंगांची तजवीज केली गेली असल्याचे समजते.