‘एक्झिट पोल’मध्ये महायुतीचा ‘गजर’

mahayuti_3
मुंबई सत्तेच्या सारीपाटात कोण बाजी मारतो ?याचे चित्र १६ मेला स्पष्ट होणार असले तरी सत्तासमीकरणात यंदा भाजपच देशपातळीवर अव्वल ठरला आहे,आणि महाराष्ट्रात महायुतीचे वारे वाहणार असल्याचा निष्कर्ष ‘एक्झिट पोल’मधून तूर्तास निघाला आहे.

महायुतीच्याच उमेदवारांना महाराष्ट्रातील मतदार राजाने कौल दिल्याचे सर्वच एक्झिट पोलचे अंदाज सांगत आहेत. संबंध भारतातील एक्झिट पोलच्या निष्कर्षांप्रमाणेच महाराष्ट्रातील अंदाजही भाजपच्या पथ्यावर आहेत. सत्ताधारी काँग्रेस आघाडीला देशाप्रमाणेच महाराष्ट्रातही काही जागांचा तोटा होणार असल्याचे या अंदाजमधून समोर आले आहे.

Leave a Comment