आयपीएलच्या अंतिम सामन्याचा आज निर्णय

ipl faynal

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून इंडियन प्रीमियर लीगचा अंतिम सामना मुंबईत होणार की बेंगळरूात होणार याचा निर्णय मंगळवारी घेण्यात येणार असल्यािचे समजते; मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरून बेंगळुरू येथे हलविण्याचा निर्णय घेतल्यानंतर नाराज झालेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनने पाठविलेल्या निषेध पत्राची दखल मंगळवारी होत असलेल्या आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत घेतली जाणार आहे. त्यामुळे अंतिम सामन्या्बाबत या बैठकीत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

यावेळी बोलताना एमसीए व बीसीसीआयचे उपाध्यक्ष रवी सावंत म्ह णाले, कार्यकारिणीच्या झालेल्या बैठकीत बीसीसीआयच्या या निर्णयाबद्दल नाराजी प्रकट करण्यात आली. यासंदर्भात आम्ही बीसीसीआय व आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलशीही चर्चा केली आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाचे अंतरिम अध्यक्ष (आयपीएल) सुनील गावस्कर यांनीही आम्हाला या पत्रावर चर्चा करणार असल्याचे सांगितले तसेच जो काही निर्णय होईल तो कळविला जाईल असे स्पष्ट केले आहे.

आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलने शनिवारी आयपीएलचा अंतिम सामना वानखेडेवरून बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळविण्याचा खळबळजनक निर्णय घेतला होता. त्यानंतर एमसीएच्या कार्यकारिणी, स्वयंसेवक आदिंनी आपली ओळखपत्रे आयपीएल आयोजकांकडे पाठवून दिली. तसेच एमसीएचे अध्यक्ष शरद पवार यांनी या निर्णयाचा निषेध करणारे पत्रही बीसीसीआयकडे पाठविण्यात आले. या पत्रात फायनल काढून घेण्यामागचे खरे कारण काय याची विचारणा करण्यात आली आहे.

Leave a Comment