आयपीएलसोडून पुजारा आला मतदानासाठी

chitteshwarpujar
राजकोट – एकीकडे मतदानाला सुटी देवून बॉलिवुडचे अभिनेते मंडळी आयफा पुरस्कारासाठी परदेशात गेली होती. असे असताना टीम इंडियाचा दमदार फलंदाज चेतेश्वर पुजारा मात्र गेल्या काही दिवसांपासून आयपीउल स्पनर्धेसाठी दुबईला गेला होता. तो स्पर्धेदरम्यामन वेळ काढून बुधवारी तो खास मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गुजरात मध्येे आला आहे. पुजाराने दुबईहून राजकोटला येऊन इतर सेलिब्रेटींसमोर एक चांगला आदर्श ठेवला आहे.

टीम इंडियाचा आघाडीचा फलंदाज चेतेश्वर पुजारा याने बुधवारी सकाळी सहपत्नी राजकोट येथील मतदान केंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजावला. चेतेश्वर पुजारा आयपीएल स्पर्धा खेळण्यासाठी दुबईत गेला होता. तो एक मे नंतर भारतात परतणार होता. मात्र खास मतदान करण्यासाठी तो राजकोटला परतला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने चेतेश्वर पुजाराला मतदानासाठी राजकोट जिल्ह्याचा ब्राण्ड अँम्बेसेडर बनवले होते. राजकोटचा रहिवाशी असणा-या पुजारा खास मतदानासाठी आला ही अभिमानाची बाब आहे. त्याने इतरांसमोर एक चांगले उदहारण ठेवले आहे. सरकार निवडीसाठी मतदान करणे हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य आहे. सर्व मतदारांना मी त्यांच्या बहूमुल्य वेळातून वेळ काढून मतदान करण्याची विनंती करतो असे पूजाराने मतदानानंतर सांगितले.

Leave a Comment