फ्रॅक्चर वेगाने दुरूस्त करणारे ऑस्टेऑईड

3d
तुर्कस्तानातील इंडस्ट्रीयल डिझायनर डेविन कारासहिन यांनी थ्री डी तंत्रज्ञानाचा वापर करून ऑस्टेऑईड मटेरियल तयार केले आहे. याचा उपयोग फ्रॅकचर वेगाने दुरूस्त करण्यासाठी करता येतो. पारंपारिक उपचारपद्धतीने प्लॅस्टर घालून मोडलेली हाडे सांधली जातात पण त्यासाठी रूग्णाला बराच काळ प्लॅस्टर ठेवावे लागते. नव्या ऑस्टेऑईड मुळे मोडलेली हाडे जुळण्याचा वेग ४० टक्कयांनी वाढतोच शिवाय प्लॅस्टरमुळे रूग्णाच्या संबंधित जखमी भागाला येणारी खाज अथवा दुर्गधीपासूनच सुटका होते असा त्यांचा दावा आहे.

ऑस्टेऑईड ला व्हेंटिलेशनसाठी भोके असल्याने रूग्णाला खाज येणे अथवा दुर्गंधी येणे हा त्रास होत नाही. या ऑस्टेऑईड सोबत कमी क्षमतेचा इन्टेन्सिटी पल्स अल्ट्रा साऊंड सिस्टीमवर चालणारा लिपस चा वापर केला जातो. त्यासाठी दिवसातून फक्त २० मिनीटे हा वापर केला तर ज्या रूग्णांची तुटलेली हाडे ३ ते ६ महिन्याच्या कालावधीतही जुळलेली नाहीत ती ८० टक्के जुळविली जातात.

रूग्णांना जादा आराम मिळावा आणि कमी वेळात फ्रॅक्चर दुरूस्त व्हावे यासाठी हे संशोधन डेविन यांनी केले आहे. ऑस्टेऑईड पर्यावरणपूरक आहेच पण ते पातळ आणि वजनाला हलके आहे. रूग्णाला जेथे दुखापत आहे तेथे थ्रीडी बॉडी स्कॅनर च्या सहाय्याने दुखापतीची जागा निश्चत केली जाते आणि ही माहिती ट्रान्स्फर केल्यानंतर त्यानुसार ऑस्टेऑईड संबंधित रूग्णाच्या जखमेवर बनविले जाते.