हळद मलेरियाविरोधी

turmeric
मलेरियाचा विकार मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे. गेल्या शतकाच्या पाचव्या आणि सहाव्या दशकामध्ये मलेरियाचा प्रतिकार करण्याच्या बाबतीत बरेच संशोधन करण्यात आले आणि काही औषधी सापडल्यामुळे विशेषत: क्विनाईलमुळे मलेरियावर बर्‍यापैकी नियंत्रण मिळवले गेले. मात्र मलेरियाचा प्रसार करणार्‍या डासांच्या शरीरामध्ये असे काही बदल झाले की, त्यामुळे डास या औषधांना दाद देईनासे झाले. केवळ डासांच्या बाबतीतच असे घडते असे नाही, इतरही अनेक रोगजंतूंमध्ये औषधांविषयीची प्रतिकार क्षमता वाढताना दिसते. त्यामुळे प्रचलित औषधे निष्प्रभ ठरतात आणि नवीन औषधांचा शोध घ्यावा लागतो. आता मलेरियासाठी अशाच प्रकारचा शोध जारी असून त्या दृष्टीने हळदीवर बरेच संशोधन केले जात आहे. हळदीतील करकुमीन हा घटक डासांसाठी घातक ठरू शकतो, म्हणजेच मलेरियासाठी उपयुक्त ठरू शकतो असे प्राथमिक प्रयोगांमध्ये आढळून आले आहे.

हळदीच्या औषधी गुणधर्मांविषयी पुरातन काळापासून बरेच काही सांगितले गेलेले आहे आणि त्यामुळे भारतीय वैद्यक शास्त्रामध्ये हळदीला खूप महत्व दिले गेलेले आहे. हळदी ही सौंदर्यवर्धनासाठी आवश्यक मानली जाते. हळद आणि दुधाच्या प्राशनाने सर्दी, पडसे कमी होते. हळद हे ऍन्टीबायोटिक औषधही असल्याचे मानले जाते. अमेरिकेत सध्या हळदीचा कर्करोग प्रतिबंधक औषध म्हणून उपयोग होऊ शकेल का, यावरही संशोधन सुरू आहे. आता हळदीचा उपयोग मलेरियाचा प्रसार रोखण्यासाठी होऊ शकेल का, यावर संशोधन होत असून प्रयोगशाळेतल्या प्रयोगांमध्ये सकारात्मक निष्कर्ष हाती यायला लागले आहेत. या संबंधात घेण्यात आलेल्या प्रयोगात हळदीच्या करकुमीन या घटकाचा जनावरांवर वापर करण्यात आला असता मलेरिया प्रतिबंधक म्हणून ते १०० टक्के उपयुक्त ठरू शकेल असे दिसून आले आहे.

बंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑङ्ग सायन्सेस या संस्थेमध्ये या संबंधीचे प्रयोग करण्यात आले आहे. मलेरियाचा जंतू डासांच्या मार्ङ्गत पसरवला जात असतो आणि मलेरियाचा मुकाबला करण्यासाठी डासांना मारण्यावर भर दिला जातो. परंतु बंगलोरच्या या प्रयोगामध्ये डासांच्या जंतूंवर हळदीचा वापर करण्यात आला. सध्या वापरले जाणारे मलेरियाविरोधी औषध आणि करकुमीन यांचा एकत्र वापर केला आणि त्यांचे इंजेक्शन मलेरिया झालेल्या काही प्राण्यांना टोचण्यात आले. तेव्हा असे आढळले की, त्या प्राण्यांच्या शरीरातील मलेरियाचे जंतू तर मरतातच पण त्या प्राण्याच्या शरीरातली मलेरियाचा मुकाबला करण्याची प्रतिकारक शक्तीही वाढते. म्हणजे करकुमीनचा उपयोग दुहेरी आहे. आता या औषधाचा प्रयोग मानवी शरीरावर केला जाणार आहे. त्यात मलेरिया झालेल्या ५० रुग्णांना हेच औषध टोचले जाईल. त्याचा उपयोग होईल असा विश्‍वास संशोधकांना वाटत आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

1 thought on “हळद मलेरियाविरोधी”

Leave a Comment