क्रोसिन ५०० च्या किंमती उतरल्या

ताप आणि वेदना कमी करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या क्रोसिन अॅडव्हान्स टॅब्लेट च्या किमती उत्पादक कंपनीने ५० टक्कयांनी कमी केल्या आहेत. गॅक्सोस्मिथ लाईन आशिया कंपनीने या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार डीपीसीओ २०१३ च्या नोटिफिकेशननुसार कंपनीने या किंमती कमी केल्या आहेत. ही कंपनी नॉन न्यूट्रिशियन उत्पादक कंपनी आहे.

क्रोसिन अँड पॅरासिटामोल फास्ट रिलीफ ५०० एमजी च्या गोळ्या यापूर्वी १५ गोळ्यांच्या स्ट्रीपसाठी ३० रूपयांना विकल्या जात होत्या. त्या यापुढे आता १४ रूपयांना १५ गोळ्या अशा किमतीत मिळणार आहेत. सप्टेंबर २०१२ मध्ये ग्लॅक्सोने क्रोसिन गोळ्यांचे उत्पादन बंद करून या गोळ्या बाजारात आणल्या होत्या आणि त्या जादा किंमतीला उपलब्ध केल्या होत्या. अर्थात क्रोसिन नावाने मिळणारी कंपनीची अन्य उत्पादने मात्र पूर्वीच्याच किमतीत मिळणार आहेत. त्यात क्रोसिन ६५०,क्रोसिन कोल्ड, फ्ल्यू अॅक्ट, क्रोसिन ड्राप्स व क्रोसिन सस्पेन्शन या उत्पादनांचा समावेश आहे.