… मग गो मूत्र शिंपडून स्मारक कुणी धुतले; राजचे भुजबळांना प्रत्युत्तर

मुंबई –  हुतात्मा स्मारक … दलित बांधवांचा मोर्चा  मग कुणी गो मूत्र  शिंपडून स्मारक धुतले होते ,असे प्रत्युत्तर देताना जुने संदर्भ वर्तमानपत्रात आहेत ,ते चाळा असा टोला  छगन भुजबळ यांना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला आहे. 

माझ्यावर नावावर कोणताही मॉल असेल तर तो मी लगेच ,ती सगळी प्रॉपर्टी भुजबळ फाउंडेशनला फुकटात देईन असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक मतदारसंघातील उमेदवार छगन भुजबळ यांनी दुबईत  मॉलसाठी पैसा आला कुठून असा  आरोप केला होता त्याला प्रत्युत्तर देताना राज ठाकरे यांनी थेट जुन्या संदर्भांनाच हात घातला,राज ठाकरे म्हणतात, ज्या माणसाने स्वतःचे नाव शाळा कॉलेजना दिले, मात्र डॉ.आंबेडकर किंवा फुले यांना तेव्हा आठवले नाही अशांनी मला शिकवू नये. 

डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या एका पुस्तकाविषयी वाद निर्माण झाला होतातेव्हा छगन भुजबळ हे मुंबईचे महापौर होतेपुस्तकाच्या वादावरून दलित बांधवांचा मुंबईत मोठा मोर्चा निघाला होतायावेळी हुतात्मा चौकाची नासधूस झालीती दलित बांधवांनी केली असा आरोप भुजबळांचा होता.त्यावेळी भुजबळांनी हुतात्मा स्मारक गो मूत्र शिंपडूनधुतले होते असा  आरोप  केला पण  याचा संदर्भ अजुनही त्या वेळेसच्या जुन्या वर्तमानपत्रात मिळतील असेही  ठाकरे यांनी म्हटले आहे.