लाच घेणा-या कल्याण डोंबिवलीच्या नगरसेवकाला अटक

ठाणे: गेल्या काही दिवसापूर्वी कल्याण डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक विद्याधर भोईर, उप अभियंता दतात्रय मसूद आणि शिपाई विलास कडू या दोघांनीही रितू भाटीया यांच्याकडे आठ लाखांची लाच मागितली होती. या महिलेकडून लाच घेत असताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्याच अधिका-यांनी सापळा रचून तिघांना अटक केली. या प्रकारामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेत खळबळ माजली असून एकाच प्रकरणात नगरसेवकासह तिघांना अटक करण्यात आली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक विद्याधर भोईर, उपअभियंता दत्तात्रय मसूद, विलास कडव अशी लाच घेताना अटक करण्यात आलेल्यां ची नावे आहेत. काही दिवसांपासून भोईर यांनी रितू भाटीया या महिलेकडे गेल्या दोन महिन्यांपासून ११ लाख रूपयांसाठी तगादा लावला होता. अखेर चार लाखांवर सौदा पक्का झाला. कल्याणच्या पौर्णिमा टॉकिजजवळील शिवसेना शाखेत रितू भाटीया यांच्याकडून चार लाख रूपये घेण्याचे निश्चित झाले. पण त्याचवेळी ठाण्याच्या लाचलुचपत अधिका-यांनी भोईर यांना लाच घेत असताना रंगेहाथ पकडले.

याप्रकरणी कल्याण डोंबिवली महापालिकेचा उप अभियंता दतात्रय मसूद आणि शिपाई विलास कडू या दोघांनीही रितू भाटीया यांच्याकडून आठ लाखाची लाच मागितली होती. याबाबत महिलेने ठाणे लाचलुचपत विभागामध्ये तक्रार केली होती. तक्रारीवरून अधिका-यांनी सापळा रचून दतात्रय मसूद आणि विलास कडू यांना अटक केली. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.