मनसेची सत्ता आल्यास राज ठाकरे होणार मुख्यमंत्री

मुंबई: आगामी काळात होत असलेल्या‍ विधानसभा निवडणुका महाराष्ट्रत नवनिर्माण सेना स्वबबळावर लढणार आहे. त्या‍नंतर जर राज्यात नवनिर्माण सेनेला बहुमत मिळाले, अथवा सर्वात जास्त जागा मिळाल्या तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री होणार असल्याचे जाहीर केले आहे. ते एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतप्रसंगी बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, ‘आगामी काळात महाराष्ट्राच्या हितासाठी कोणतीही जबाबदारी स्वीकारेन. येत्या काळात होत असलेल्ये लोकसभा निवडणुकीत मला रिझल्ट द्यायचा आहे. त्यामुळे जिंकण्यासाठी मी कमी जागा लढवत आहे. ज्या ठिकाणी मनसेने उमेदवार उभे केले आहेत, त्या ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवारही आहेत. त्यामुळे फक्त शिवसेनेविरोधात मनसेने उमेदवार उभे केले, असं म्हणणं चुकीचे आहे.’

याशिवाय बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ब्ल्यू प्रिंट येत्या ऑगस्ट महिन्यात जाहीर करेन, अशी घोषणाही राज यांनी यावेळी केली. प्रत्येकांनी मी आल्यानंतर सर्वकाही सुतासारखे सरळ होईल असे वाटत असल्याने सर्वांनी माझ्याकडून जास्त अपेक्षा ठेवू नयेत, असेही यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी स्पअष्टू केले. शरद पवार यांनी केलेल्या कौतुकाची भीती वाटते. त्यांनी केलेली टीका एकवेळ परवडते, पण कौतुक नाही, असेही राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.