धवनला मिळणार सेहवागसोबत खेळण्याची संधी

मुंबई- मुंबई इंडियनकडून खेळत असताना मास्टि ब्लास्टर सचिनबरोबर खेळण्याचे भाग्य मला लाभले. त्याने मला वेळावेळी सुचना दिल्याय होत्या. सरावाच्या वेळी माझ्या फलंदाजी व गोलंदाजीच्या शैलीतील कमकुवतपणाबद्दल मला त्याने काही चांगल्या सूचना दिल्या. त्याचा उपयोग मला झाला असून आगामी काळात आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना मला वीरेंद्र सेहवाग या आणखी एका महान खेळाडूबरोबर खेळण्याची संधी मिळणार आहे, हा माझ्यासाठी बहुमान आहे, असे अष्टपैलू खेळाडू ऋषी धवन याने येथे सांगितले.

यावेळी बोलताना ऋषी धवन म्हणाला, ‘गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सला विजेतेपद मिळाले, त्या वेळी विजेत्या संघाचा एक घटक म्हणून मला आनंद घेता आला. हा क्षण माझ्यासाठी अतिशय संस्मरणीय आहे. आता वीरुबरोबर खेळण्याची संधी मला मिळत आहे. त्याचा पुरेपूर फायदा मी घेणार आहे. यावेळी सचिनचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यातचा फायदा आगामी काळात होणार आहे.’

यंदाच्या रणजी मौसमात खेळताना ऋषी याने ४५० धावा केल्या आहेत. तसेच त्याने या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेण्याची कामगिरी केली आहे. त्यामुळेच त्याला किंग्ज इलेव्हनने तीन कोटी रुपयांच्या बोलीवर खरेदी केले आहे. मी अव्वल दर्जाचा अष्टपैलू खेळाडू आहे हे सिद्ध करण्यासाठी आयपीएल स्पर्धा माझ्यासाठी उत्तम संधी आहे. मात्र त्याचे कोणतेही दडपण मी घेणार नाही. मी फक्त माझ्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करणार आहे. चांगली कामगिरी झाल्यानंतर भारतीय संघाची दारे मला खुली होतील असा आत्मविश्वास असल्याचे यावेळी बोलताना धवन यांने स्पष्ट केले.

Leave a Comment