लोकसभेच्या रिंगणात नातलगांची मांदियाळी

पुणे – आगामी काळात होत असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राज्यातील प्रमुख पक्षांनी नातलगानाच उमेदवारी देवून घराणेशहीच पुढे आणली आहे. देशभरात राजकीय पक्षाच्या प्रमुख नेतेमंडळीचा वारसा पंरपरेनुसार त्यांच्या नातेवाईकाकडेच येत आहे. महाराष्ट्रात असलेल्या ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी २५ मतदारसंघातून राजकीय नेत्यांच्या नातलागांनाच उमेदवारी देण्यात आल्याने घराणेशाहीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.

देशभरात राजकीय पक्षाच्या प्रमुख नेतेमंडळीचा वारसा पंरपरेनुसार त्यांच्या नातेवाईकाकडेच येत आहे. सोनिया गांधी नंतर आता कागेंसची सुत्रे खासदार राहूल गांधी यांच्याकडे आले आहेत. तर भाजपमध्ये देखील घराणेशहीला कमी नाही. छत्तीखसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांचे चिरंजीव लोकसभेच्या आखाडयात उतरले आहेत. तिकडे बिहारमध्ये लोक जन शक्ती पाटीचे नेते रामविलास पासवान यांचे चिरंजीव चिराग पासवान लोकसभेच्या मैदानात नशीब आजमवात आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यांदव यांची कन्या निवडणूक रिंगणात उतरली आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी कागेंसचे नेते शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे मैदानात उतरल्या आहेत. भाजपचे स्वर्गीय नेते प्रमोद महाजन यांची कन्या पुनम महाजन या वडिलाचा वारसा चालविण्यासाठी लोकसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत. याशिवाय अनेक मातब्बर मंडळीचे नातेवाईक लोकसभा लढवत आहेत.

घराणे शाहीची सर्वात जास्त लागण महाराष्ट्रात झाली असून राज्यातील प्रमुख चार पक्ष असलेल्या कॉग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेनेच्या नेतेमंडळीनी कित्येयक वर्षांपासून मक्तेचदारी असलेले हे मतदारसंघ इतरांच्याा ताब्या्त जावू नये म्ह णून नातेवाईकांची वर्णी लावली आहे. त्यालमुळे अनेक दिवसांपासून पक्षाचे काम निष्ठेरने करणा-या कार्यकर्त्यां ना मात्र, गप्पच बसावे लागणार आहे.
आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीसाठी काँग्रेसने सर्वाधिक ११ जणांना राजकारणाचा वारसा असलेल्या घरातील उमेदवारांना तिकीटे दिली आहेत. यामध्येे स्वर्गीय नेते शंकरराव चव्हाण यांचे चिरजीव माजी मुख्यवमंत्री अशोक चव्हाण, वनमंत्री पंतगराव कदम यांचे चिरंजीव डॉ. विश्वजीत कदम, माजी मंत्री रजनी सातव याचे चिरंजीव राजीव सातव, माजी मंत्री मेघे यांचे पुत्र सागर मेघे, औरंगाबादचे माजी आमदार पाटील यांचे पुत्र नितीन पाटील, जालन्याचे माजी आमदार औताउे यांचे पुत्र विलास औताडे यांचा समावेश आहे. त्याचशिवाय पूर्वींपासून खासदार असलेले खासदार मुकूल वासिनक, स्वीर्गीय नेते सुनील दत्तच यांच्या कन्या प्रिया दत्त, महसूल मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे, माजी मुख्य मंत्री वसंतदादा पाटील यांचे नातु प्रतिक पाटील, माजी मंत्री मुरली देवरा याचे चिरंजीव मिलिंद देवरा हे पुन्हा निवडणूक लढवत आहेत.

राष्ट्रवादी कॉग्रेसने दहा जणांना निवडणूकीच्या आखाडय़ात उतरविले आहे. माजी आमदार महादेव महाडिक यांचे पुत्र धनंजय महाडिक, अमरावतीचे आमदार राणा यांच पत्नी नवनित राणा, रामराजे निंबाळकर यांचे जावई राहुल नार्वेकर, माजी आमदार पवार याच्या सुनबाई डॉ. भारती पवार, माजी आमदार राजळे यांचे पुत्र राजीव राजळे, माजी आमदार श्ंकरराव मोहिते पाटील यांचे पुत्र विजयसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी दिली आहे. शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे, माजी आमदार पाटील यांचे चिरंजीव संजय दिना पाटील, मंत्री गणेश नाईक यांचे पुत्र संजीव नाईक, माजी खासदार प्रकाश परांजपे यांचे चिरंजीव आनंद परांजपे ही खासदार मंडळी पुन्हा नशीब आजमावत आहेत.

या शिवाय भाजपने या निवडणूकीत तीन जणांना रिंगणात उताविले आहे. यामध्ये स्वर्गीय नेते प्रमोद महाजन यांच्यां कन्या पूनम महाजन, माजी आदिवासी मंत्री डॉ. विजय गावित यांच्या कन्या डॉ. हिना गावित आणि एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे प्रथमच निवडणूक लढवत आहेत.

शिवसेनेने तीन नातलगांना उमेदवारी दिली आहे. ठाण्याचे जिल्हा प्रमुख एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे, कोल्हापूरचे माजी खासदार सदाशिव मंडलिक यांचे चिरंजीव संजय मंडलिक यांना सेनेने उमेदवारी दिली आहे. तर माजी आमादार गळवी यांच्या कन्या खासदार भावना गवळी पुन्हा नशीब आजमावत आहेत. देशात सर्वात जास्ति घराणेशाही महाराष्ट्रात पहावयास मिळते तब्ल राज्यातील २५ मतदार संघातून नेतेमंडळीचे नातलग लोकसभेच्या आखाडयात उतरले आहेत.

Leave a Comment