अॅपलच्या आयफोन तीनची डुप्लिकेट असलेला प्योंगयांग टच नावाचा स्मार्टफोन उत्तर कोरियात विकला जात असून अॅपलच्या फोनमध्ये काही स्थानिक बदल करून हा फोन तीन रंगात उपलब्ध करून दिला गेला असल्याचे वृत्त आहे.

अॅपलच्या आयफोन तीनची डुप्लिकेट असलेला प्योंगयांग टच नावाचा स्मार्टफोन उत्तर कोरियात विकला जात असून अॅपलच्या फोनमध्ये काही स्थानिक बदल करून हा फोन तीन रंगात उपलब्ध करून दिला गेला असल्याचे वृत्त आहे.
उत्तर कोरियात २००८ साली कम्युनिस्ट राजवटीत थ्री जी नेटवर्क सुरू झाले होते. त्यानंतर देशातील मोबाईल युजरची संख्या लक्षणीयरित्या वाढली. गतवर्षात ही संख्या २० लाखांवर गेली आहे. गतवर्षीच्या ऑगस्टमध्येच प्योंगयांग टच हा स्मार्टफोन स्वदेशी बनावटीचा म्हणून बाजारात आणण्यात आला तेव्हा त्याचे नामकरण एरिरेंग असे केले गेले होते. त्यावेळी उ. कोरियाचा नेता किम जांग युनने या कारखान्याला भेटही दिली होती.
मात्र गतवर्षी देशात स्मार्टफोनचे उत्पादन सुरू झाले असल्याची घोषणा केली गेली असली तरी ही माहिती असत्य असल्याचे आणि हे फोन चीनमधून आयात केले जात असल्याचे सांगितले जात आहे. चीममधून आलेल्या मालात कांही स्थनिक बदल करून ते स्वदेशी म्हणून विकले जात असल्याचे समजते. उ. कोरिया हा मागासलेल्या देशांत गणला जातो आणि तेथे तंत्रज्ञानाचा विकास अत्यंत कमी आहे असेही समजते.