महाराष्ट्र वाचवायचा,मग आघाडी सरकार हटवा – मोदी

सोलापूर –  महाराष्ट्र वाचवायचा असेल तर काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार हटवा असे आवाहन भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी सोलापूर येथे प्रचारसभेत केले.यावेळी त्यांनी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, केद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, आदर्श घोटाळ्यातील माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी मोदी म्हणाले ,महाराष्ट्रातील  जनतेची समस्या सोडवण्यात येथील सत्ताधारी नेते अपयशी ठरले आहेत.  

उलट येथील राज्यकर्ते शिवराळ भाषेत आपल्या प्रतिक्रिया देतात. शरद पवारांनी जनतेचा अपमान केला आहे. आश्वासने देऊन ते  जनतेला फसवत  आहेत,  धनगर समाजाचीही फसवणूक केली आहे. अशा शब्दात  मोदींनी शरद पवारांवर टीका केली तर पोलिसांचे गणवेश सोलापूरात का बनवत नाहीत?असा सवाल केंद्रीय  गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांना केला तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य करताना महाराष्ट्रातील जनतेला , शेतकऱ्यांना पिण्याचे पाणी का मिळत नाही?असा टोला लगावला.  मोदींनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या घोषणापत्रावरही टीका केली. भाजपचे  सरकार आल्यावर शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागणार नाहीत. देशाला शासकाची नाही तर सेवकाची गरज आहे. हा देश लोकशाहीवर चालतो. जनतेने निवडणूकीत हे दाखवून द्यावे.असे आवाहन केले

Leave a Comment