सन फार्माने १९ हजार कोटीला घेतली रणबक्षी

सन फार्मास्युटिकल्स इंडस्ट्रीजने गेले काही दिवस अडचणीत आलेल्या रणबक्षी लॅबोरेटरीची तब्बल ३.२ अब्ज डॉलर्स म्हणजे १९ हजार कोटींना खरेदी केली असून रणबक्षीचा पूर्ण हिस्साच कंपनीने घेतला आहे. या विक्री करारानुसार रणबक्षीच्या शेअरधारकांना १० शेअर मागे सन फार्माचे ८ शेअर दिले जाणार आहेत. सध्या कंपनीच्या शेअरचे मूल्य ४५७ रूपये असल्याचे सांगितले जात आहे.

रणबक्षीच्या खरेदीमुळे सन फार्मा विशिष्ठ जेनेरिक औषधे बनविणारी जगातील पाचवी मोठी कंपनी बनणार आहे. भारतात ती पहिल्या नंबरची कंपनी असेल. कंपनीचा व्यवसाय ६५ देशांत असून पाच महाद्विपात कंपनीचे ४७ कारखाने असतील असेही सांगितले जात आहे.