
पुणे : रस्त्यावर उसाचे गुर्हाळ चालविणार्या महिलेला रसाची मागणी करून तिच्यावर लष्करातील जवानाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एम्प्रेस गार्डन येथील लष्काराच्या नर्सरीच्या तंबूत या जवानाने तिला धमकावून परवा दुपारी बलात्कार केला. त्यानंतर तिच्या पतीला मारहाण केली.मधुकर राम देडे (वय-41, सध्या रा. सब एरिया, 101 बटालियन स्टाफ, अर्जुन मार्ग, रेसकोर्सजवळ, घोरपडी. मूळ रा.जळकोटवाडी, ता.तुळजापुर, धाराशिव) असे अटक केलेल्या जवानाचे नाव आहे. पीडीत महिलेने या संदर्भात वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे; अशी माहिती वानवडीचे सहाय्यक पोलिस निरिक्षक राहुल गौड यांनी दिली.ही महिला आणि तिचा पती मूळचे नगर जिल्ह्यातील आहेत.
