‘गुड नाइट मलेशियन 370’ हा होता ‘कॉकपिट’मधून आलेला शेवटचा मेसेज!

क्वालालंपूर- मलेशियन एअरलाइन्सचे बेपत्ता विमान ‘MH370’चे गूढ अद्याप कायम आहे. शोधकार्यात अपयशी ठरलेल्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्यामुळे मलेशिया सरकारवर चहुबाजूंनी टीका होत आहे. ‘MH370’बाबत एक धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. ही माहिती विमान बेपत्ता झाल्यानंतर तब्बल चार आठवड्यांनंतर समोर आली आहे. ती म्हणजे, ‘MH370’च्या कॉकपिटमधून आलेला शेवटचा मेसेज ‘ऑल राइट, गुड नाइट’ नसून ते ‘गुड नाइट मलेशियन 370’ हा होता. 

मलेशियन सरकारने ते बदलून घेतल्याचे मलेशियाई ऑथिरिटीने सांगितले. बेपत्ता ‘MH370’बाबत अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती लपविल्यामुळे चीन सरकारने मलेशियन सरकारने धारेवर धरले आहे. विमान बेपत्ता झाल्यानंतर ‘कॉकपिट’मधील शेवटचा मेसेज ‘गुड नाइट मलेशियन 370’ असा होता. विशेष म्हणजे  ‘बोइंग777’च्या ‘कॉकपिट’मधून आलेला हा मेसेज एक ‘स्टॅंडर्ड साइन ऑफ’ समजून त्याच्याकडे फारसे लक्ष देण्यात आले नाही. ‘सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंट’ने सांगितले, की एअर ट्रॅफिक कंट्रोल आणि ‘MH370’चे कॉकपिटमधील अंतिम संभाषणाचा तपास लागला आहे .

कॉकपिटमधून आलेला शेवटचा मेसेज ‘गुड नाइट मलेशियन 370’ असा होता. त्यानंतर काही मिनिटांच विमानाचा संपर्क तूटला. विमान मलेशियाकडे परतत असतानाच ते हिंदी महासागराच्या दिशेने वळले. ‘गुड नाइट मलेशियन 370’ हा शेवटचा मेसेज वैमानिकाचा होता, की सहाय्यक वैमानिकाचा होता याची चौकशी केली जाणार असल्याचे सिव्हिल एव्हिएशनने सां‍गितले आहे. MH370च्या ‘कॉकपिटमधून ”ऑल राइट, गुड नाइट” असा शेवटचा मेसेज आल्याचे मलेशियन सरकारने 12 मार्च रोजी जाहीर केले होते. सहाय्यक वैमानिकाच्या मुखातील हे शब्द असल्याचेही सांगण्यात आले होते.