लातूर: दहा दिवसांपुर्वी लातूर येथील काँग्रेसच्या पदाधिकारी कल्पना गिरी यांच्यान खूनाचे गुढ पोलिसांनी उलघडले आहे. दोन दिवसांपूर्वी याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली होती. पोलिसांच्याे चौकशी दरम्याुन कल्पाना गिरीचा खून तलावातील पाण्याटत ढकलून युवक काँग्रेसचा शहर अध्यक्ष महेंद्रसिंह चौहान यानेच केल्याची कबूली या प्रकरणातील सहआरोपी समीर किल्लारीकरने दिली आहे.
रंगपंचमी दिवशी तुळजापूरजवळच्या तलावात लातूर युवक कॉग्रेसच्या पदाधिकारी कल्पना गिरी यांचा मृतदेह सापडला होता. गिरी यांच्याा नातेवाइकांनी कल्पना गिरी यांचे अपहरण करून तिच्यामवर बलात्कार झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला होता. तसेच या सगळ्यांमध्ये युवक काँग्रेसच्या पदाधिका-यांचाच हात असल्याची आरोपही त्यांनी पत्रकारपरिषद घेवून केला होता.
या प्रकरणात लातूर पोलिसांनी चौकशीसाठी तीन दिवसांपूर्वी महेंद्रसिंह चौहानसह समीर किल्लारीकरला अटक करण्यात आली होती. यापैकी महेंद्रसिंह चौहान हा युवक काँग्रेसचा शहर अध्यक्ष आहे तर समीर किल्लारीकर सदस्य आहे. या दोघांन दहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. महेंद्रसिंह चौहान आणि कल्पना या दोघांमध्ये वाद झाला होता. शिवाय महेंद्रसिंह चौहानचे फटकून वागणे कल्पनास आवडत नव्हते. त्यानंतर महेंद्रसिंहने तुळजापूरजवळील तलावात कल्पनाला ढकलून तिचा खून केला,’ असा कबुलीजबाब समीर किल्लारीकरने दिला आहे. त्या मुळे या खूनाचे रहस्या आता उलघडले आहे.