आप ने मिळवल्या देशात 385 चांगल्या व्यक्ती

लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा आता मतदानाकडे जात असतानाही प्रमुख पक्ष अजूनही उमेदवारांच्या शोधात आहेत. दुसरीकडे आम आदमी पार्टीसारख्या दोनच वर्षाच्या पक्षाने देशभरातून आतापर्यंत 385 चांगल्या व्यक्ती उमेदवार म्हणून निवडून त्यांची नावे जाहीर करत प्रस्थापितांना धक्का दिला आहे.

निवडणुकीनंतर केंद्रात सत्तेत येण्याचे दावे काँग्रेस – भाजप करत आहे. त्याच वेळी काँग्रेसला वाराणसीत नरेंद्र मोदींच्या विरोधात तर भाजपला अमेठी राहुल गांधी आणि रायबरेलीत सोनियांच्या विरोधात उमेदवार अद्याप सापडलेले नाहीत. दोन्ही पक्षांनी आयारामांना तिकीट देण्याचे इतीकर्तव्यही केले आहेत असे असूनही त्यांना उमेदवारांचा शोध घ्यावा लागत आहे. या दोन्ही पक्षांकडे उमेदवारीसाठी कोणतेही निकष नाहीत. कशाही पद्धतीने निवडून येण्याची क्षमता या एकाच निकषावर त्यांचे तिकीट वाटप सुरू आहे.

या दोन्ही पक्षांच्या तुलनेत आम आदमी पार्टी नवी आहे. अवघ्या दोनच वर्षापूर्वी या पक्षाची स्थापना झाली. त्यानंतर त्यांनी दिल्लीची विधानसभा जिंकली. आता ते लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याकडे गुन्हेगारी पार्श्वभूमी नको, भ्रष्टाचाराचे आरोप नकोत, नियमित कर भरणारे असावेत कर चुकवेगिरी करणार नसावेत असे अनेक निकष त्यांनी उमेदवारीसाठी लावले आहेत. या शिवाय उद्योगपती, बिल्डर्सना तिकीट नाकरण्याचेही धाडस त्यांनी केले आहे.

असे क्लीष्ट निकष लावूनसुद्धा त्यांना देशभरातील 543 मतदारसंघांपैकी 385 मतदारसंघांसाठी उमेदवार मिळाले आहेत.काँग्रेस – भाजपने काही स्थानिक पक्षांशी आघाड्याही केल्या आहेत. त्यामुळे सर्वच्या सर्व 543 उमेदवार देण्याचे बंधन या दोन्ही पक्षांवर राहिलेले नाही. त्यांच्या वाट्याला आलेल्या जांगांवरच त्यांना उमेदवार द्यायचे असूनही त्यांना उमेदवार मिळत नाहीत. पण आम आदमी पार्टीने अशी कोणतिही आघाडी एकाही पक्षाशी केलेली नाही. अशा परिस्थित त्यांना देशातून चांगल्या 385 व्यक्तींची निवड उमेदवार म्हणून केलेली आहे. या सर्व उमेदवारांची माहितीही त्यांनी वेबसाइटवर दिलेली आहे.

देशाचे नेते शरद पवार गेली 42 वर्षे राजकारणात असूनही त्यांना महाराष्ट्रात 22 उमेदवार देता आले नाहीत. राज ठाकरे यांचा मनसे सात वर्षे जुना, लोकसभा निवडणूक लढवलेला पक्ष असूनही त्यांच्या उमेदवारांचा आकडा 12 च्या पुढे गेलेला नाही. या दोन्ही नेत्यांच्या तुलनेत आम आदमी पार्टीने केलेली उमेदवार निवडीची कामगिरी वरच्या दर्जाचीच मानावी लागेल.

Leave a Comment