एअरटेल डिजिटल टिव्हीची पॉकेट टिव्ही सेवा

डीटीएच ऑपरेटर एअरटेल टिव्ही ने पॉकेट टिव्ही सेवा सुरू केली असून अँड्राईडवर चालणार्‍या फोनसाठी ही सेवा युजर घेऊ शकणार आहे. गुगल प्ले स्टोअरमधून हे अॅप मोफत डाऊनलोड करता येणार आहे. युजरला या सेवेसाठी दरमहा ६० रूपये शुल्क भरावे लागणार आहे. हे अॅप म्हणजे टिव्ही व मोबाईलचे कन्व्हर्जन आहे.

या सेवेच्या माध्यमातून युजरला १५० पेक्षा अधिक टिव्ही चॅनल्स लाइव्ह पाहता येणार आहेत. त्याचबरोबर व्हिडीओ अॅक्सेसही मिळणार आहे. चॅनल व व्हिडीओ फिल्टर सुविधा, अॅडव्हान्स इलेक्ट्रोनिक प्रोग्रॅम गाईड, आवडते चॅनल सेट करण्याची सुविधा, सोशल मिडिया, प्रोग्रॅम रिमांईंडर सेट करण्याची सुविधा अशा अन्य सोयी युजरला या सेवेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत.