लंडन – लोकप्रिय कार्यक्रम, खेळांच्या स्पर्धा ज्यात ब्रिटनची महाराणी सामील असेल असे कोणतेही गर्दीचे कार्यक्रम यापुढे राणीसाठी सुरक्षित नाहीत कारण अल कायदाने अशा कार्यक्रमावर दहशतवादी हल्ले करावेत असे आदेश सिरीयातून परतलेल्या जिहदींना दिले आहेत. अशा हल्ल्यात मानवी बाँब, टायमर अथवा रिमोटचा उपयेाग केला जाऊ शकतो असे सांगितले जात आहे.
एका इंग्रजी मासिकाकडे अल कायदाने ब्रिटन,फ्रान्स व अमेरिकेत कोणत्या जागी हल्ले होऊ शकतात याची संभावित यादी दिली असल्याचे वृत्त आहे. त्यानुसार विंबल्डन, एफए कप, अशा गर्दी खूप असणारया क्रीडा स्पर्धा हे मुख्य टार्गेट असेल असे समजते. ब्रिटनच्या गृहमंत्री थेरेसा मई यांनी २०१० पासून ब्रिटनने ३७ लोकांचे तर २०१३ मध्ये २० लोकांचे नागरिकत्व रद्द केले आहे. हे लोक सिरीयातील दहशतवादी संघटनांत सामील झाले असावेत असे सांगितले जात आहे.
ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री विलियन हेग यांनी सिरीया हा सध्या जगभरातील दहशतवादी संघटनांचा अड्डाच बनला असल्याचे सांगितले असून ब्रिटनमधील किमान १०० लोक तेथे असावेत असाही अंदाज वर्तविला आहे. याच लोकांकडून ब्रिटनवर हल्ले होण्याची शक्यता आहे.