डॉ.सायरस पूनावाला यांना ‘पुण्यभूषण पुरस्कार’

पुणे – जगातील सर्वात मोठी निरनिराळ्या व्याधींची नियंत्रणासाठी वापरली जाणारी लस निर्माण करणारी सिरम इंस्टिट्यूट स्थापन करणारे त्याच प्रमाणे लस निर्मितीला लागणार्‍या घोड्यातून जगातील दर्जेदार घोड्याची पैदास करणारे डॉ सायरस पूनावाला यांना यावर्षीचा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर यांच्या निवड समितीने डॉ.पूनावाला यांची निवड केली आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या पुरस्काराचे वितरण होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ.सतिश देसाई यांनी दिली.

पुरस्काराचे हे 26वे वर्ष आहे.  स्मृतिचिन्ह आणि एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी मधुकर फडणीस, शांता रानडे, दत्तात्रय भुतकर, गजाभाऊ पिंगळे, विक्रम देशमुख या पाच स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. यापूर्वी पुण्यभूषण पुरस्काराने शंतनुराव किर्लोस्कर , पं.भीमसेन जोशी, पु.ल.देशपांडे, नृत्यांगणा डॉ.रोहिणी भाटे, डॉ.श्रीराम लागू आदींना सन्मानित करण्यात आले आहे.

पूनावाला ग्रुपचे अध्यक्ष असलेले डॉ.पूनावाला यांनी 1966 मध्ये सिरम इन्स्टिट्यूट ऑम इंडियाची स्थापना केली. आज ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी म्हणून ओळखली जाते. अश्‍व पैदास. बांधकाम व्यावसाय अशा विविध क्षेत्रात ते कार्यरत आहेत. त्यांना 2005 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत करण्यात आली आहे. तसेच तसेच पतंप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Leave a Comment