हीना गावित यांचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांची कन्या हीना गावित यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गावीतांना इशारा दिला होता. जर हीना गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे पवार म्हणाले होते. मात्र पवारांच्या या इशा-याला केराची टोपली दाखवल्याचे स्पष्ट झाले आहे. तर पक्ष प्रवेशानंतर हीना गावित यांना नंदुरबामधून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. 

दरम्यान, हीना गावित यांच्या भाजप प्रवेशामुळे विजयकुमार गावित यांना मंत्रिमंडळातून वगळण्यासाठीचे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे दिले आहे. हे पत्र पुढील कारवाईसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आले आहे.

Leave a Comment