अधिक थकवा धोकादायक

सध्याचे जीवन ङ्गार धावपळीचे झालेले आहे. माणसे लवकर उठतात, घाईघाईमध्ये आन्हिके आटोपतात, बकाबका ब्रेकङ्गास्ट करतात आणि धावत सुटतात. दुपारी कधी तरी जेवतात, दिवसभर सारखा चहा पीत राहतात आणि रात्री थकून घरी येतात. आपण किती काम करत आहोत, त्या कामाच्यामध्ये विश्रांती आहे की नाही, कामामुळे शरीराची झीज किती होते, ती झीज भरून काढण्याइतपत पौष्टीक अन्न आणि पुरेशी विश्रांती आपल्याला मिळत आहे की नाही याचा विचार करण्याइतकी उसंत सुद्धा त्यांना मिळत नाही. भरपूर धावपळ करून भरपूर पैसा कमवणे या एका गोष्टीने ते एवढे उद्युक्त झालेले असतात की, पैसे कमावून आपण काय गमावत आहोत याचे त्यांना भानच रहात नाही. थकलेल्या अवस्थेत काम करायला लागलो की तणाव येतो. तो तणाव शरीरावरही असतो आणि मनावरही असतो. परिणामी कामात चुका होतात. अमेरिकेमध्ये करण्यात आलेल्या एका पाहणीमध्ये अती थकव्यामुळे काय परिणाम होऊ शकतात हे दिसून आले आहे. ६६ टक्के डॉक्टरांनी थकव्यातून आलेल्या तणावातून आपण एक तरी चूक आठवड्याला करतोच, असे सांगितले. 

त्याशिवाय अनेक कंपन्यांनी सुद्धा अती थकलेल्या कर्मचार्‍यांमुळे आपले किती नुकसान होते याची पाहणी केली आहे. तिच्यानुसार प्रत्येक कंपनी दर कर्मचार्‍यामागे वर्षाला ५२० मनुष्य तास वाया घालवत असते. सातत्याने येणारा थकवा नजरेआड करत गेलो तर तो क्रॉनिक ङ्गटिक सिंड्रोम (सीएङ्गएस) मध्ये रुपांतरित होतो. अधूनमधून होणारा सामान्य थकवा बी व्हिटॅमीनच्या गोळ्यांनी आणि पुरेशा विश्रांतीने भरून निघू शकतो. परंतु हाच थकवा सीएङ्गएसमध्ये रुपांतरित झाला की मात्र तो सामान्य औषधो-पचाराने आणि केवळ विश्रांतीने दुरुस्त होत नाही. त्यामुळे थकव्यापोटी काही विशिष्ट लक्षणे जाणवायला लागली की रुग्णाने आपल्याला सीएङ्गएस तर झाला नाही ना असे म्हणून डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. त्याची काही लक्षणे आहेत. 

पहिले लक्षण म्हणजे कितीही विश्रांती घेतली तरी थकवा जात नाही. शांत आणि सलग झोप लागत नाही. कामावर लक्ष केंद्रित होत नाही. स्मरणशक्ती कमी व्हायला लागते. विसरभोळेपणा वाढायला लागतो. स्नायू दुखायला लागतात. वेदनाशामक औषधे घेतली तरी स्नायूंचे दुखणे तात्पुरते थांबते आणि या स्नायूंच्या वेदना कायम राहतात. सीएङ्गएसमध्ये सांधे दुखतात पण तो काही संधीवात नसतो. सांध्याला सूज न येता सांधे दुखतात आणि सांध्यावर लालसरपणा येतो. अनाकलनीय वाटावी अशी डोकेदुखी सुरू होते आणि ती तीव्र स्वरुपाची असते. मानेमध्ये वेदना व्हायला लागतात. सातत्याने घसा सुजायला लागतो. आवाज बसल्यासारखा होतो. तेव्हा आपल्याला थकवा यायला लागला आणि थकव्यासोबत डिप्रेशन यायला लागले तसेच वरील लक्षणे दिसायला लागली की, सीएङ्गएसच्या दृष्टीने तपासणी करून घ्यावी.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment