स्वाभिमानी संघटना दोन मतदारसंघात बाजी मारणार-शेट़टी

कोल्हापूर – राष्ट्रवादी कॉग्रेंसने यावेळी निवडणूकीत फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे. विशषत त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विरोधात तगडे आव्हान उभे केले आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी स्वाभिमानीची विरोधात ‘शुगर लॉबी’ एकवटली आहे. तरी स्वाभिमानी हातकणंगले व माढा दोन्ही मतदारसंघात निश्चितपणे विजय प्राप्त करेल, असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी पुढे बोलताना शेटी म्हणाले, हातकणंगलेत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे व माढय़ामध्ये सदाभाऊ खोत यांच्याविरोधात राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते-पाटील यांना उभे करण्यात आले आहे. पवार यांनी कितीही ताकद उभी केली तरी स्वाभिमानी दोन्ही मतदारसंघात निश्चितपणे विजय प्राप्त करेल, महायुतीमध्ये आरपीआय,स्वाभिमानी, रिपाइं, रासप यांचा समावेश झाल्याने ताकद वाढली असून राज्यात ३५ जागांवर विजय प्राप्त होईल.

आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी लोकहिताचे विषय घेऊन महायुती लोकांसमोर जाणार आहे. टोलमुक्त महाराष्ट्र, राज्यातील शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प, विकलेल्या साखर कारखान्यांची चौकशी, सिंचन घोटाळ्यांची चौकशी हे विषय आम्ही लोकांसमोर पोहोचविणार आहोत. या माध्यमातून सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा पंचनामा करणार आहोत. आघाडी सरकारच्या निष्क्रिय कारभारामुळे जनतेमध्ये तीव्र नाराजी असून ते महायुतीकडे सत्ता सोपवतील असा विश्वास शेटी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

Leave a Comment