फेसबुकवर जाहिरातीसाठी दिवसाला २५ लाख डॉलर्स?

जगभरातील नंबर वन ची सोशल मिडिया साईट फेसबुक टेलिव्हीजन प्रमाणेच व्हीडीओ जाहिराती दाखविण्यास लवकरच सुरवात करणार आहे. फेसबुकचे आज १.२ अब्ज युजर आहेत आणि ही संख्या लक्षात घेऊन येथील जाहिरातींचे दर दिवसाला २५ लाख डॉलर्सच्या दरम्यान असतील असा अंदाज या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.

फेसबुकच्या प्रॉडक्ट मार्केटिंग मॅनेजर सुसान बुकनर म्हणाल्या की जाहिरातींसाठीच्या ट्रायल यापूर्वीच घेण्यात आल्या आहेत. जाहिरातीबाबत किती लोक उत्सुक आहेत याचीही पाहणी फेसबुक करणार आहे. १५ सेकंदाची जाहिरात न्यूज विभागात अॅटोमॅटिक येईल. त्याचे दर अद्याप ठरविले गेलेले नसले तरी टिव्ही प्रमाणेच ते ठरतील असेही त्यांनी सांगितले. पुढच्या महिन्यापासून फेसबुकवर या जाहिराती दिसणार आहेत.

Leave a Comment